Ad will apear here
Next
शिवा काशीद

सख्यांनो, सध्याच्या कॉम्प्युटर युगात सामान्य माणूस सुद्धा आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतो. काहीच अवघड राहिले नाही आता. पण शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मोहरे गमवावे लागले. 

अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावून महाराजांना पाठबळ दिले. त्यांचा पराक्रम ऐकून थक्क व्हायला होतं. त्यापैकीच एक मोहरा म्हणजे शिवा काशिद. आजही पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवा काशिद च्या समाधीशी नतमस्तक होताना ऊर भरून येतो. त्यांचा जन्म पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेल्या  नेबापूर या गावात नाभिक समाजात झाला. ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात न्हावी काम करत असत. त्यांचा चेहरा शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता.

शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला. पण त्यामुळे आदिलशहा प्रचंड चिडला आणि त्याने भरपूर कुमक देऊन पन्हाळ्याला वेढा घालून शिवाजीराजाना पकडण्यासाठी सिद्धी जौहारला पाठवले. चार महिने महाराज तेथे अडकून पडले. तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कट रचला व सिद्धी जोहार बरोबर तहाची बोलणी सुरू केली. सहाजिकच सिद्धी गाफील राहिला.

12 जुलै  1660. आषाढी पौर्णिमा. रात्रीचे अंदाजे दहा वाजले होते. महाराज निवडक सहाशे मावळे बरोबर घेऊन पालखीतून निघाले. त्याच वेळी तिथून दुसरी पालखी निघाली त्यात शिवाजीसारखा पोशाख करून शिवा काशिद निघाले. सिद्धीला बरोबर चकवा देऊन महाराज निसटले पण पालखी तला शिवा काशिद मुद्दाम तिथे रेंगाळत राहिला. 

सिद्धीच्या सैनिकांनी त्याला पकडले व " गनीम गनीम " म्हणून पाठलाग करून पालखी सिद्धी जौहार समोर उभी केली. शिवा काशीद बरोबर होते अवघे  पंधरा-वीस मावळे आणि घेरले होते 3000 यवनांनी. सिद्धी समोर शिवाजीच्या वेशातील शिवा काशिद उतरले. सिद्धी ने तात्काळ ओळखले हा तोतया शिवाजी आहे. रागाने बेभान होऊन त्याने तलवार उपसली व विचारले " तुला मरणाची भीती वाटत नाही का? " या मर्द मावळ्याने निर्भीड छातीने उत्तर दिले " माझ्या धन्यासाठी मी एक हजार वेळा मरण पत्करेन." रागाने लालबुंद झालेल्या सिद्दीने त्याच्या पोटात तलवार खुपसली. पण इकडे तोपर्यंत शिवाजीमहाराज हुलकावणी देत सुरक्षितस्थळी पोचले होते

असे हे नेबापुरचे  शिवा काशीद. मैत्रिणींनो पन्हाळगड ला जाल तेव्हा त्याच्या समाधीला जरूर भेट द्या आणि नतमस्तक व्हा. कोटी कोटी प्रणाम या निधड्या छातीच्या वीराला.

सौ. कुंदा कुलकर्णी

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VSRIDA
Similar Posts
शिस्तप्रिय टिकेकर बाई उगार खुर्द (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयातल्या शिक्षिका लीलाताई टिकेकर आठ मार्च २०२१ या दिवशी नव्वदी पार करून ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या एका विद्यार्थिनीने त्यांच्यावर लिहिलेला हा लेख.....
आदरणीय रामतीर्थकर मास्तर उगार (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयाला नावारूपाला आणण्यासाठी श्रीनिवास अनंत रामतीर्थकर मास्तर यांनी आपले तन-मन-धन पणाला लावले होते. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. सात डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या एका विद्यार्थिनीने लिहिलेला हा लेख...
सर्वांच्या लाडक्या कारेकर बाई उगार खुर्द (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयातल्या, सर्वांच्या लाडक्या कारेकर बाई यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. त्या निमित्ताने त्यांच्या एका विद्यार्थिनीने त्यांच्यावर लिहिलेला हा लेख...
विद्यार्थ्यांची माय वर्देबाई कुंदा, तुझ्या कारेकर बाईंमध्ये एक माय दडलेली आहे. जिचं सारं जग विद्यार्थ्यांमध्ये सामावलेलं आहे. राजश्री या माझ्या मैत्रिणीचा हा शेरा पाहिला . डोळे टचकन भरून आले. आणि लगेच श्रीहरी विद्यालयातली दुसरी "माय" आठवली. "वर्दे बाई.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language